आमच्या हृदयाचे स्पंदन ! आमची आवड !!
नाटक हा एक साहित्यप्रकार आहे असे म्हणण्यापेक्षा तो एक दृक्श्राव्य कलाप्रकार आहे, असे म्हणणे युक्त ठरेल. नाटक या संज्ञेचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. त्यात व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. नाटकामध्ये चुकीला माफी नाही. रिटेक नाहीत. थेट प्रक्षेपण. आणि इथेच कलाकाराचा कस लागतो किंवा कसलेला कलाकार झालेली चूक मायबाप प्रेक्षकांच्या लक्षात देखील येऊ देत नाही.
महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्टाला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे. रुची वाढवण्यासाठी नाटके बघणे आवश्यक आहे. काही नाटके केवळ मनोरंजन करतात तर काही अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. काही नाटकांमधून त्याच्या भोवतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे. असो. नाटकांबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
इन्टरनेट वर उपलब्ध असलेली नाटके आम्ही आपणास या संकेतस्थळावर बघण्याची संधी देत आहोत. आपल्या मराठी नाटकांचा आस्वाद घ्यावा ही विनंती
आणि बरीचशी मराठी गाणी या संकेत स्थळावर संकलित केली आहेत
आठवणीतली गाणी
भजन / आरती संग्रह